नाशिक

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले

दिंडोरी : प्रतिनिधी
पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरांत वर्षभर पुरेल असे चटकदार कैरीचे लोणचे बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. घरोघरी लोणच्याच्या तयारीला गृहिणींनी वेग दिला आहे. बाजारात गावरान कैरी
खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. लोणचे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या कडक, ताज्या व आंबट गावरान कैर्‍यांना सध्या विशेष मागणी आहे.
यंदा कैर्‍यांचे दर तुलनेने स्थिर असून, बाजारात कैरी 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत आहे. मात्र, वाढत्या महागाईचा परिणाम लोणच्यासाठी लागणार्‍या मसाल्यांवर दिसून येत आहे. लाल तिखट, मोहरी डाळ, मेथी, हळद, हिंग, तसेच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट काहीसे कोलमडले आहे.
बाजारात अनेक महिला कैरी जागेवरच फोडून घेण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी विक्रेत्यांकडून प्रतिकिलो अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे घरातील मेहनत कमी होत आहे. लोणचे तयार करण्याचे काम अधिक सोयीस्कर होत असल्याचे महिलांनी सांगितले.
वर्षभर टिकणारे आणि पारंपरिक चवीचे अस्सल गावरान लोणचे तयार करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याची ही परंपरा आजही कायम असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

पहिला पाऊस पडला की, घरात लोणच्याच्या तयारीला सुरुवात होते. यंदा कैर्‍यांचे दर परवडणारे आहेत. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे तयार करण्याचा मानस आहे. मसाल्यांचे दर वाढले असले तरी घरच्या घरी बनवलेल्या गावरान लोणच्याची चव आणि टिकाऊपणा वेगळाच असतो.
– ललिता गांगोडे, गृहिणी, वारे

पारंपरिक पद्धतीने बनवलेले कैरीचे लोणचे हे प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे. तयार मसाले वापरण्यापेक्षा स्वतः मसाला तयार करून लोणचे बनवण्यावर आम्ही भर देतो. पहिल्या पावसाच्या सरींसोबतच कैरीच्या लोणच्याचा दरवळ बाजारपेठांमध्ये पसरला आहे.
– शीतल राहाणे, गृहिणी

With the onset of rain, there is a rush to make pickles at home.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago