तपासणीच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी
नियमित तपासणीसाठी आलेल्या महिलेची तपासणीच्या बहाण्याने लैंगिक छळवणूक करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड येथील एका डॉक्टरविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित डॉक्टर अजित खालकर यांचा नाशिकरोड येथील रेजिमेंटल प्लाझासमोर दवाखाना आहे. दि. 23 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी महिला ही मूळव्याध आजाराबाबत नियमित तपासणीकरिता डॉ. खालकर यांच्या दवाखान्यात गेली होती. डॉ. खालकर यांनी तपासणीचे निमित्त करून पीडितेला दवाखान्यातील केबिनमध्ये नेले. तेथे फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करून पीडितेची संमती न घेता पाइल्ससंबंधी चेकअप करताना विनयभंग केला, तसेच पीडितेसोबत अश्ीलल भाषेत संभाषण करून पीडितेची लैंगिक छळवणूक केली. महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डॉ. खालकरविरुद्ध लैंगिक छळाचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Woman molested on the pretext of examination

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *