नाशिक

महिलेला गुंगीचे पदार्थ पाजले; आक्षेपार्ह व्हिडिओ काढले

सिडको : विशेष प्रतिनिधी
सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेला गुंगीचे पदार्थ पाजून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढत बदनामीची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश अशोक पगार (वय 30, रा. उतराणे, नामपूर, ता. बागलाण, जि. नाशिक) याने
फेसबुकच्या माध्यमातून पस्तीसवर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर 26 मार्च 2020 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंचवटी गंगाघाट परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
यावेळी संशयिताने महिलेला पाण्यातून काहीतरी पाजल्याने तिला चक्कर आली. त्यानंतर जवळील हॉटेलमध्ये नेऊन सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत तिचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित हॉटेलचे नाव व पत्ता फिर्यादीला माहिती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संशयिताने फोन करून फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी महिलेकडून वेळोवेळी धनादेश, ऑनलाइन व्यवहार तसेच रोख स्वरूपात खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Woman was fed with Gungi food; objectionable video was made

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

22 seconds ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

8 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

14 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

19 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

25 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

40 minutes ago