अन्य दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
सिडको : विशेष प्रतिनिधी
हॉटेल मिर्ची ते टाकळी लिंक रोड परिसरात 2023 मध्ये झालेल्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, 29 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी मिर्ची हॉटेल ते टाकळी लिंक रोडवरील ऑटो कॉप्ट ऑटो मोबाइल गॅरेजलगत असलेल्या पंक्चर दुकानासमोर ही घटना घडली होती. या प्रकरणात यश कैलास गोंधळी ऊर्फ पवार (रा. संत कबीरनगर, द्वारका), प्रसाद रामनाथ पवार (रा. शिवनगर, औरंगाबाद रोड), विजय राजेंद्र पाटील (रा. अमरधाम, पंचवटी) तसेच एका विधिसंघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मोहम्मद गुलाम रब्बानी (वय 23, मूळ रा. बिहार, सध्या टाकळी लिंक रोड, नाशिक) हा पंक्चर दुकानावर काम करत होता. आरोपींनी त्यांच्या दुचाकींमध्ये हवा भरण्यास सांगितले होते. त्यानंतर पुन्हा परत आल्यानंतर गाड्यांमध्ये हवा न भरल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी रब्बानी यास मारहाण केली. त्यावेळी आरोपी यश पवार याने धारदार शस्त्राने वार केल्याने रब्बानी गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. शिंदे यांनी केला होता. त्यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, कोर्ट क्रमांक 3 येथे झाली. न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 यश कैलास गोंधळी ऊर्फ पवार यास दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी प्रसाद पवार आणि विजय पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी कामकाज पाहिले. तसेच अभियोग कक्ष, आडगाव पोलीस ठाणे आणि न्यायालयीन पथकाने खटल्याच्या पाठपुराव्यासाठी विशेष प्रयत्न केले.
The main accused in the murder case was sentenced to life imprisonment.
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…