नाशिक

वणी खुर्दला दारूविक्रीविरोधात महिला आक्रमक

राज्य उत्पादन शुल्क, दिंडोरी पोलिसांकडे दारूबंदीची मागणी

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वणी खुर्द येथे नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. आक्रमक महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक कार्यालय, तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली.
गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन जिवाला मुकले आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. गावात दारूबंदीसाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली नाही. आक्रमक महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला. दिडोरी पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे दारूबंदीची मागणी केली. यावेळी सरपंच आशा रेहरे, सोनाली धुळे, वंदना बोरसे, लक्ष्मी शेवरे, भारती चव्हाण, शकुंतला शेवरे, सीमा भोसले आदी महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीचे दुकानेच नाहीत, तरीही अवैध दारू विक्री करणारांकडे दारूचे बॉक्स येतातच कस? राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदारांना बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाहीना, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.

आतापर्यंत पोलिसांना दोन वेळा निवेदने दिली. नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनाही निवेदन दिले. मात्र, गावात राजरोस अवैध दारूविक्री सुरू आहे, आज दिलेल्या निवेदनावर कार्यवाही झाली नाही, तर सर्व नागरिक उपोषणाला बसतील.
– आशा सोमनाथ रेहरे, सरपंच, कोचरगाव

दारूबंदीचे गावाने ठरविले आहे. दारू विक्री करणार्‍यांवर कारवा केली जाईल. यापुढे गाव परिसरात दारू विक्री होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
– रघुनाथ शेगर, पोलिस निरीक्षक, दिंडोरी

Gavkari Admin

Recent Posts

ओव्हरलोड ट्रक रस्त्याखाली उतरला अन पुढे असे काही घडले….

मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार बघा व्हिडिओ मनमाड: प्रतिनिधी मनमाड जवळ पुणे-इंदौर…

15 hours ago

फेसबुकवर मैत्री: मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर

फेसबुकवर मैत्री मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर फेसबुक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाडी विक्रीचा प्रयत्न शहापूर: साजिद…

20 hours ago

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील आरोपी फरार ,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर चौकीतील घटना…

1 day ago

सातपूरला ऑडीला अचानक आग

पपया नर्सरी येथे ऑडी गाडीला आग; पुढील भाग जळून खाक सिडको विशेष प्रतिनिधी :-सातपुर परिसरातील…

1 day ago

खोडाळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

खोडाळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. मोखाडा : नामदेव ठोमरे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी…

1 day ago

दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी

दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी दिंडोरी ग्रामस्थांचा  नाशिक कळवण मार्गावर रास्ता रोको दिंडोरी :…

2 days ago