राज्य महिला आयोगाचा पुढाकार पुणे प्रतिनिधी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यात महिला वारकऱ्यांची संझ्याही मोठी आहे, दिंडीत महिला वारकऱ्यांना पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चा क ण कर यांनी पुढाकार घेत ला आहे, महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. त्यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना खालीलप्रमाणे काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे. या सुविधा पुरवा १. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी. २. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे. ३. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. ४. महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावावेत. या सुविधा महिला वारक-यांना उपलब्ध करून दिल्यास, पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु होण्यास मदत होईल. याबाबतीत पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत निर्देश देण्यात आलेले आहेत. हे ही वाचा :
| |
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…