नाशिक

कुंदेवाडी-सायाळे पूरचारी प्रवाह वळविण्याच्या कामास प्रारंभ

आंधळे वस्तीपर्यंत पोहोचणार पूरचारीचे पाणी  खंबाळेच्या शेतकर्‍यांना दिलासा

सिन्नर : प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या खंबाळे गावातील खोपडी खुर्द (आंधळे वस्ती) परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून देवनदीवरील कुंदेवाडी-सायाळे पूरचारीचे पाणी स्थानिक बंधार्‍याकडे वळविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाण्याचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
आंधळे वस्ती परिसरातील ग्रामस्थांनी अलीकडेच आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मांडला होता. पुराच्या काळात वाहून जाणारे पाणी शेतीसाठी उपयोगात आणावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आमदार कोकाटे यांनी तातडीने दखल घेत संबंधित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या कामामुळे खंबाळे परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, वर्षानुवर्षे पाण्याअभावी त्रस्त शेतकर्‍यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. भविष्यात शेती उत्पादन वाढीसाठीही या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कामाला सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी आ. कोकाटे यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच मीननाथ डावरे, विश्वनाथ आंधळे, संतोष सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रत्येक शेतकर्‍याच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचविणार

तालुक्यातील प्रत्येक शेतकरी महत्त्वाचा आहे. कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने प्रत्येक शिवारापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Work begins on diverting the flow of the Kundewadi-Sayale flood channel.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आडगावला तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न

मिसफायरमुळे अनर्थ टळला पंचवटी : प्रतिनिधी आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. 18)…

5 minutes ago

सिन्नर आगारात ‘हिरकणी’ बसला आग

डिझेल पंपाजवळच थरार! रात्री रस्त्यात बंद पडली, सकाळी डेपोत पेटली सिन्नर : प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या…

11 minutes ago

देवळालीगावात बोहड्यातील रेणुकामाता देशमुख वाड्यात

सुमारे 100 वर्षांची परंपरा जोपासत आहेत भाविक नाशिकरोड : एस. आर. सुकेणकर एकेकाळी देवळालीगाव बारा…

19 minutes ago

गोदाकाठी घुमणार 501 शंखवादकांचा ‘शंखनाद’

नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 25 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजता गोदाकाठी अनंत…

27 minutes ago

त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावरील ध्वजस्तंभावरून वाद

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच सुरक्षेची धाकधूक; 24 तास खडा पहारा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर…

43 minutes ago

गांधीनगरमध्ये होणार 65 फुटी रावणाचे दहन

सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…

1 hour ago