सिडको : प्रतिनिधी
पैसे न दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून मारहाण केल्याची घटना वडाळागाव परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफजल खान असलम खान (वय 22, रा. रेहमतनगर, गल्ली क्रमांक 2, वडाळागाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते साडी विक्रीचा व्यवसाय करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमतनगर गल्ली क्र. 2 येथे आरोपी अजीम शेख, नदिम शेख, यार खान व त्यांचा एक साथीदार यांनी संगनमत करून फिर्यादीकडे महिनाभरापूर्वी पैसे मागितले होते. पैसे न दिल्याचा राग मनात धरून आरोपी अजीम शेख याने हातातील धारदार वस्तूने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करून जखमी केले. या हल्ल्यानंतर फिर्यादी खाली पडल्यावर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या खिशातील आठ हजार 700 रुपये खाली पडून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत ’तुला बघून घेतो, येथे राहू देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल येथे जबाब दिल्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शेख करीत आहेत.
Young man attacked with sharp weapon in anger over non-payment
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…