सातपूरमध्ये तरुणाचा कोयत्याने खून

सातपूरमध्ये तरुणाचा कोयत्याने खून
सिडको : दिलीपराज सोनार
सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील पार्थ पॅलेस येथे रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून २२ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव जगदीश (भैय्या) वानखेडे (वय २२) असून तो श्रमिकनगर येथे राहत होता. त्याचे मूळ गाव सटाणा आहे. वानखेडे कंपनीतून काम करून रात्री घरी परतत असताना काही टवाळखोर गुंडांनी त्याला रस्त्यात थांबवले. दुचाकीवरून जाणाऱ्या वानखेडे याच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. त्यांनी संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *