मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या युवकास अटक
लासलगाव प्रतिनिधी
सातपूर येथे एका तरुणाने गायीवर केलेल्या अत्याचारची घटना ताजीच असताना अशीच घटना लासलगाव येथे शनिवारी घडली.शहरातील सार्वजनिक रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरावर अनैसर्गिक अत्याचार करून त्यांना मारहाण करणाऱ्या युवकाविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स पो नि भास्करराव शिंदे यांनी दिली.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव शहरातील विद्या नगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास आरोपी कुंदन कुमार शत्रुघ्न महतो,वय-22 वर्षे,रा.गणेश नगर,लासलगाव हा अर्धनग्न अवस्थेत उभा राहून सार्वजनिक रस्त्यावर जमिनीवर बसलेल्या मोकाट जनावरासोबत लगट करून त्यास एका हाताने क्रूरपणे मारहाण करून वेदना होईल असे कृत्य करतांना आढळून आला.
या बाबत फिर्यादी पद्माकर प्रभाकर साखरे लासलगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध प्राण्यांना छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम – 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास स पो नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नीचळ करत आहे
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…