नाशिक

मोटारसायकलला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण

गणेश चौकातील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा

सिडको : प्रतिनिधी
मोटारसायकलला कट मारल्याचा जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी तरुणासह त्याच्या दोन मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यातील एकाने लोखंडी पाइपने तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस प्रहार केल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी साईदास ईश्वरदास बैरागी (रा. गणेश चौक, सिडको) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून जयेश परदेशी याच्यासह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बैरागी हे त्यांचे मित्र भूषण बडगुजर आणि आकाश मिश्रा यांच्यासोबत मोटारसायकलवरून अंबड गावाच्या दिशेने जात होते. गणेश चौक परिसरात त्यांच्या दुचाकीला तिघांनी कट मारला. याबाबत बैरागी यांनी तिघांना जाब विचारला.
याचा राग आल्याने तिघांनी बैरागी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी त्यांना मारहाण केली. यावेळी जयेश परदेशी याने लोखंडी पाइपने बैरागी यांच्या डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सोमनाथ गुंड करीत आहेत.

Youth assaulted after questioning a ‘cut’ (dangerous maneuver) made against his motorcycle.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago