सप्तशृंगगडावर गणेशघाटात पिकअप उलटून युवक ठार

ज्योत आणताना घडला अपघात

वणी : प्रतिनिधी
सप्तशृंगगडावर ज्योत आणण्यासाठी जाणारी पिकअप गणेशघाटात वळणावर पलटी झाल्याने एक भाविक ठार, तर 11 जण जखमी झाले. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालेगाव तालुक्यातील भिलकोट, झोडगे, शेजवाळ, गुगलवाड येथील भगवती भक्त आपल्या गावातील नवरात्रोत्सवाकरिता ज्योत घेण्यासाठी रविवारी (दि. 21) दुपारी चारच्या सुमारास पिकअपमधून जात होते. घाटातील वळणावर पिकअप पलटी झाल्याने यातील 12 जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिका व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून आणले. यांपैकी उमेश धर्मा सोनवणे (वय 17) मृत झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *