आस्वाद

झोंबी : एक अदृश्य स्वप्न

– अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी

झोंबी नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय की पाहिल्यासारखं वाटतंय? दोन वर्षांपूर्वी आलेला सिनेमा झोंबी यावरून असंच वाटत असेल की, आजचा लेखही माझा काहीतरी भुताटकीतलाच आहे की काय, तर हा अंदाज अगदी चुकीचा आहे.
…तर आजचा एक लेख आहे माझ्या वाचनात आलेल्या आणि मला खूप जास्त आवडलेल्या आनंद यादव यांच्या झोंबी या पुस्तकावर.
एका अंदया नावाच्या मुलाची कथा यातून समोर येते आणि ती मनाला अगदी भांबावून टाकते. तर वाचन हे कधीच वाया जात नसतं असं म्हणतात त्याचा अगदी प्रात्यक्षिक म्हणजे यातल्या मुलाची कथा लहानपणापासूनच अतिशय गरिबी गरीब शेतकर्‍याच्या घरातलं वाढणारे हे मुल त्याचे शिक्षणासाठी चाललेली प्रचंड धडपड वाचताना असं जाणवते की आपण अगदी समोर आणि जवळून बघतोय आणि वाचन क्षमतांना असं कळून चुकतं की आपण किती सहज मिळणारे गोष्टींसाठीसुद्धा रडत असतो.
आठ-नऊ भावंडांचं घर. त्यात खाण्याचा तुटवडा. त्यात शिक्षणाचे नाव कळलं तरी वडिलांकडून होणारे त्याची मारहाण. शेतात-चिखलात राबलेल्या अंगकपड्यांनीच त्याचा शाळेत धावत जाणं आणि त्या तशा परिस्थितीतही प्रत्येक वर्षी उत्तम यश मिळवून पुढे जाणं अगदी कसरतीचं आणि घ्यावं तितकं आदर्शाच हे प्रतीक होय. महात्मा गांधींचे निधन झाले त्या काळात शेतकर्‍यांची अवस्था, त्या अवस्थेत शेतातल्या प्रत्येक कामाचा अतिशय सुंदर टिपण्णी करणे आणि ते प्रत्येक काम अतिशय अचूकपणे पार पाडून कधीकधी आजूबाजूच्या शेतातली काम करून सुद्धा तर कधी कोणाची शिकवणी घेऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. शाळांपासून महाविद्यालयापर्यंतचा चांगला-वाईट अनुभव अतिशय अचूक, पण यात रंगवला गेला आहे. त्यात गरीब घरातल्या मुलांना प्रत्येक वेळेस शिक्षणासाठी सवलत मिळेल का? हे असे शाळेतील खर्‍याखोर्‍या गोष्टी अगदी सुंदर भाषेत रंगवल्यात. घरात जर कर्त्या पुरुषाचा शिक्षणाला विरोध असेल तर ते मुलांना किती अवघड होऊन जातं ते यात दाखवलंय. पूर्वीच्या काळी मुलगा खाल्ल्याशिवाला म्हणजे तो करता झाला असे समजून त्याच्यावर अनेक जबाबदार टाकणारा बाप आणि त्याचा बालपण हिरावून घेणारं ते जबाबदार्‍यांचे ओझं किती जड होतं ते आजच्या पिढीला कळणारसुद्धा नाही. कारण आजच्या पिढीला मोठ्यांइतक्या सवलती तर हव्या असतात, मोठ्या माणसांनी त्या सुख -सोयी तर हव्या असतात, पण मोठ्यांसारखे कष्ट नकोसे असतात. अगदी सहज सोप्प मिळणारं आयुष्य. सुखकर आयुष्य जगतानासुद्धा अनेक जण तक्रार करत असतात की याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही. मला अजून मोठं व्हायचंय.
एकंदरीत हा लेख लिहिण्याचा माझा उद्देश इतकाच होता की, आपण 90 च्या दशकापासून जर पाहत असू तर वाचन ही एक अतिशय जवळची आणि जिव्हाळ्याची गोष्ट आपल्यासाठी होती पुस्तक वाचन. मग ती कशातरी माध्यमातून मिळवून का असेना. त्यासाठी एक धडपड असायची. जशी या लेखकाचीसुद्धा.वाचनासाठी प्रचंड धडपड दिसली, पण आताच्या पिढीला वाचनाचा अजिबात गंध नाही.त्यांना मोबाइल, सोशल मीडिया हीच जवळची वाटतात.पुस्तकांच्या प्रेमात पडलं की पुस्तक आपल्याला आपलेसे करतात, पण त्यातून मिळणारे ज्ञान हे किती लाखमोलाचे हे ते वाचल्यावरच समजते. ती कितीही वाचा, तुमचे डोळे खराब होणार नाहीत आणि सोशल मीडियाला दिला तितका वेळ जर तुम्ही एका पुस्तकाला दिला ना तर आपल्या ज्ञाना भरच पडेल. आपल्या सामान्य ज्ञानातदेखील भर पडेल. आयुष्यात माणसाने जगताना किती रडावं, किती सुधरावं, किती सावरावं.
काही दिवसांपूर्वी मी एका वस्तीत काही कामानिमित्त गेले असताना, तेथे सातवीची मुलगी पहिली-दुसरीच्या वर्गातल्या मुलांचा अभ्यास घेत होती. एका ओट्यावर बसून. त्यांचा किलबिलाट चालला होता. मी सहज उत्सुकतेने तिकडे गेले आणि काही वेळ निरीक्षण केलं तर माझ्या लक्षात आलं ती स्वतःसोबत त्या मुलांचाही अभ्यास दररोज घेत होती. कारण ती वर्गात चांगली हुशार होती, असं तिथल्या एका लहान मुलाने सांगितलं.याला म्हणतात जिद्द. शिक्षणाची, शिकण्याची आणि शिकवण्याची. चांगली श्रीमंत माणसं प्रॅक्टिकल असतात. आपली प्रगती कशी होईल आपण त्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजे, यामागे धावतात. मात्र, या लहान मुलांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी ती म्हणजे, मला बघायला मिळाली तर तिला फक्त स्वतःचीच प्रगती नाही करायची, तर तिच्या आजूबाजूला राहणार्‍या त्या लहान लेकरांनासुद्धा तिला ज्ञान देण्याची इच्छा आहे आणि ती इतक्या कमी वयात आहे.
मी म्हणजे झपाटलेला, पछाडलेला आपल्या एखाद्या ध्येयासाठी अतोनात वेडा झालेला आणि तो सारांश या पुस्तकातला मी लेखाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वप्न असं बघावं
त्यासाठी भारावून जावं
की जिद्दीने एक दिवस
ते जिंकून दाखवावं.

Zombie: An Invisible Dream

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago