गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांवर नेणार
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र आता माओवादमुक्त झाला आहे, अशी ऐतिहासिक आणि दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 30) मुंबईत केली. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्याच्या सुरक्षिततेबाबत अनेक धाडसी निर्णय व भविष्यातील कृती आराखडा मांडला.
माओवादाविरुद्धच्या प्रदीर्घ लढाईत महाराष्ट्र पोलिसांनी मिळवलेल्या यशाचे मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले. या संघर्षात आपल्या प्राणांची आहुती देणार्या 244 शहीद पोलीस जवानांचे त्यांनी अत्यंत भावुकपणे स्मरण केले. या लढाईत अहोरात्र सेवा बजावणार्या आणि शौर्य गाजवणार्या 360 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना विशेष पदक देऊन गौरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी त्यांना शिक्षा होणे अनिवार्य आहे. सध्या महाराष्ट्रात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण (कन्विक्शन रेट) 50 टक्के आहे. विशेषतः ’सेशन्स ट्रायल’मध्ये हे प्रमाण कमी असून, ते 95 टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी पोलीस दलासमोर ठेवले आहे. यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून तपासातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्यातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ’ड्रग फ्री कॅम्पस’ ही विशेष मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार आहे. तसेच, वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलीस दल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
पोलीस तपासात ’एआय’ चा प्रवेश- बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असल्याने, पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत महाराष्ट्र पोलीस दल डिजिटल क्षेत्रात मोठी झेप घेणार असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायप्रक्रिया वेगवान केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोलीस वेल्फेअर आणि ताणतणाव व्यवस्थापन
केवळ तंत्रज्ञानच नाही, तर पोलीस दलातील मानवी घटकाचाही विचार या बैठकीत करण्यात आला. पोलिसांपुढील आव्हाने, त्यांचे कल्याणकारी प्रकल्प आणि कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी सरकार विशेष पावले उचलत आहे.
तर भागात नक्षलवाद
संपुष्टात आला : अमित शहा
नवी दिल्ली :
छत्तीसगडच्या बस्तर भागातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. देशाला डाव्या विचारसरणीच्या अतिरेकापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा या विषयावर गृहमंत्री शहा बोलत होते. शहा म्हणाले की, नक्षलवाद्यांचे मूळ कारण विकासाची मागणी नसून विचारधारा आहे. आज बस्तरमधून नक्षलवाद जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा स्थापन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या भागातील प्रत्येक गावात शिधावाटपाची दुकानं उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक तहसील आणि पंचायतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. लोकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले.
‘Maoist’ free of Maharashtra: Chief Minister
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…