अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; 200 पोलिसांचा चोख बंदोबस्त
नाशिक : प्रतिनिधी
तिडके कॉलनीतील मिलिंदनगर झोपडपट्टीतील 28 अनधिकृत घरांवर जेसीबी चालवून जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत मिलिंदनगर येथे नंदिनी नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आलेे. मात्र, या कामात सदर अनधिकृत घरे अडथळा ठरत होती. अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि.13) सकाळी 9 वाजेपासून मोहीम हाती घेत घरे हटवली.
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुर्डीकर, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह अधिकार्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रस्तेकामांसह जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, ही कामे करताना अतिक्रमणाचा मोठा अडथळा येत आहे. पालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मिलिंदनगर येथील झोपडपट्टीतील 29 अनधिकृत घरे तोडण्यासाठी महापालिका प्रशासन एक-दीड महिन्यापासून तयारी करत होते. दरम्यान, सदर कारवाई टळावी, याकरिता रहिवाशांकडून प्रयत्न केले, परंतु प्रशासनाने येथील घरे हटवत परिसर मोकळा केला.
कोणाच्या आशीर्वादाने घरे उभी राहिली
महापालिकेच्या अतिक्रमणने शुक्रवारी पक्क्या घरांवर कारवाई केली. मात्र, या घरांना कुणाचे अभय होते, घरे बांधताना पालिकेतील अधिकारी काय करत होते, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…