संपादकीय

प्रेम हे This is love

प्रेम हा शब्द जरी अडीच अक्षराचा असला तरी त्या शब्दात अनेक भावना गुंतलेल्या असतात. प्रेम ठरवून होत नाही. प्रेमाला कोणतीही ठराविक साचेबद्धता नाही. वय, रंग, रूप, जात, भाषा, प्रांत या सगळ्या सीमारेषा भेदण्याची शक्ती प्रेम या अडीच अक्षराच्या शब्दात असते. प्रेम हे जगाला विसरायला भाग पाडत नाही तर स्वतःलाही विसरायला भाग पाडणारे आहे. पण काळ बदलला तसे प्रेमाचे स्वरूपही बदलत चालले आहे. पूर्वी एक दुजे के लिए असणारे प्रेम आता एक फुल दो माली असे झाले आहे. तारुण्याची चाहूल आणि त्यातून निर्माण होणारं आकर्षण, ओढ सगळंच मनाला हवंहवंसं वाटणार. कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेत प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं सेम असते असे लिहिले. पण, सध्याच्या काळात प्रत्येकाच्या प्रेमाचं स्वरूप बदलत चालले आहे. पहिल्यांदा प्रेमात पडणे आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेणे हे जणू आता दुर्मिळ झाले आहे. तू ही रे माझा मितवा म्हणत असताना ….तुही रे माझा कितवा असे म्हणण्याची स्थिती सध्या तरुणाईची आहे. आजच्या युगात सगळ्याच गोष्टी इन्स्टट झाल्याने जणू प्रेम ही इन्स्टट झाले आहे. इन्स्टट प्रेमाचं आयुष्यही अल्प आहे. पहिलंवहिलं प्रेम किंवा प्रेमातील गांभीर्य कमी होत आहे. प्रेमाची व्याख्या बदलत भावनिकतेकडून प्रेम व्यावहारिकतेकडे जात आहे. त्यामुळे खरे प्रेम एकदाच होऊ शकते, असे सांगणारे प्रेमवीर आता दिसत नाही. ऐसा पहिली बार हुआ असे म्हणणारी तरुणाई आता ऐसा दुसरी, तिसरी बार हुआ है असं म्हणताना दिसत आहेत. प्रेमात त्याग भावना संपून स्वार्थ भावनेला वाव दिला जात असल्याचे चित्र आहे.
प्रेमाविषयी असलेलं कुतूहल, मालिका, चित्रपट, कथा-कादंबर्‍यांतून पाहिलेलं, वाचलेलं प्रेमाचं स्वरूप आणि स्वतःचं असं प्रेमाविषयीच कल्पनाविश्व आणि आजूबाजूला असणारे प्रेमाविषयीचे चित्र या सगळ्याची सरमिसळ होऊन प्रेमाचे स्वरूप बदलत आहे. प्रेम हे पवित्र बंधन आहे, असे मानणारी जुनी पिढी ते प्रेमाला फॅशन समजणारी नवी पिढी, असे स्थित्यंतर प्रेमात घडवून आले आहे. प्रेम ठरवून होत नाही हे जरी खरे असले, तरी प्रेमात अनेक वेळा भावनिक गुंतवणुकीबरोबरच शारीरिक गुंतवणूकही होत असते. कदाचित यातून अनेक समस्या निर्माण होऊन अनेक आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. सहज, सुंदर, प्रेमाच्या निर्मळ भावनेवर बदलत्या प्रेमाच्या व्याख्येमुळे मळभ येत आहे. कदाचित आजच्या प्रेमाचे स्वरूप पाहून
‘प्रेम म्हणजे काय असतं.. जे फक्त शेवटपर्यंत तिच्यात आणि आपल्यात असतं, त्याच्यात आणि आपल्यात असतं’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींतील अर्थ जणू आजच्या पिढीला अजून उमजला नाही, असेच सध्याच्या लव्ह बर्ड्सकडे पाहून वाटते.

This is love

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

12 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

1 day ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

1 day ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

1 day ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

1 day ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

1 day ago