नाशिक

नऊशे थकबाकीदारांना मनपाच्या नोटिसा

करवसुलीसाठी प्रशासन सक्त

नाशिक : प्रतिनिधी
थकबाकीचा आकडा सातशे कोटींच्या घरात गेल्याने महापालिका प्रशासनाने 909 थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा धाडल्या आहेत. दरम्यान, करदात्यांना मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी माहे
फेब्रुवारी व मार्च 2026 चे सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी वसुली केंद्र कार्यालय व भरणा कार्यालये सुरू ठेवण्यात आलेले आहे.
शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व तसेच नाशिक पश्चिम या सहा विभागांतील 909 थकबाकीधारकांना महापालिकेने जप्तीचे वॉरंट बजावले आहे. मिळकतधारकांनी अधिपत्र बजावणी केल्याच्या दिनांकापासून 21 दिवसांच्या आत थकीत मालमत्ता कर भरणा न केल्यास सदरच्या मिळकती लिलाव प्रक्रियेत घेऊन जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मिळकतधारकांनी मालमत्ता कर दिलेल्या मुदतीत भरून सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे. दरम्यान, थकबाकीदारांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. कर विभागाने सहाही विभागांतील तीन हजार थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

Municipal Corporation notices to nine hundred defaulters

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

15 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago