नाशिक

शहरातील रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

रिक्षाचालकाने महिला, पुरुषाला केली मारहाण

सिडको : विशेष प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयानजीक एका रिक्षावाल्याने प्रवाशाला काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ, तसेच पंचवटीतील दिंडोरी नाका परिसरात एका महिलेला रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर झळकला आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शहरात रिक्षा व्यवसायात बिनधास्तपणे फोफावणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांनी आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरटीओच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणार्‍या मुजोर रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई राबवली. या कारवाईअंतर्गत सुमारे 25 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पूर्णतः कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात आली आहे. शहरात रिक्षाचालकांच्या वाढत्या गैरकृत्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना लक्षात घेता, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून केलेली ही कारवाई आवश्यक आणि योग्य होती.पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कायद्याची अंमलबजावणी यामुळे रस्त्यावरील बेदरकार वर्तनाला आळा बसण्यास मदत होणार आहे.
कायदा सर्वांना समान असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, हा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईद्वारे दिला आहे.शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे नाशिककर नागरिकांनी खुलेपणाने स्वागत केले असून, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

3 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

8 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

12 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

15 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

22 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

36 minutes ago