नाशिक

वर्क फ्रॉम होमच्या आमिषातून 45 लाखांची फसवणूक

टेलिग्रामवरील प्रॉपर्टी रिव्ह्यू टास्कच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याची तक्रार

सिडको : प्रतिनिधी
वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून कमाईचे आमिष दाखवून टेलिग्रामवरील विविध आयडीधारकांनी प्रॉपर्टी रिव्ह्यूचे ऑनलाइन टास्क दिले. त्यातून अधिक नफा मिळेल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडत एका व्यक्तीची तब्बल 45 लाख 50 हजार 197 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी टेलिग्राम आयडीधारक तसेच संबंधित बँक खातेधारक आणि एका संकेतस्थळाच्या लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत इंटरनेट व फोनच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. Manohar Zinjal, @megha_1234 (Prasan Megha), ASHUTOSH PRABHU (@Ashutoshlax) आणि Member Support (@MemberSupport_DP1) या टेलिग्राम आयडीवरून फिर्यादीशी संपर्क साधण्यात आला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून त्यानंतर ऑनलाइन प्रॉपर्टीला रिव्ह्यू देण्याचे टास्क देण्यात आले.
टास्क सुरू करण्यासाठी https://douglasprestigeestates.com ही लिंक पाठविण्यात आली. लिंकवर क्लिक केल्यानंतर Douglas Elliman या नावाचे पेज उघडून त्यावर नोंदणी करण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आणखी एक लिंक पाठवून फिर्यादीला Douglas Prestige Circle या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये सुमारे 45 सदस्य होते.
ग्रुपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार विविध प्रॉपर्टीचे ऑनलाइन रिव्ह्यू करण्याचे टास्क देण्यात आले. त्यातून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेगवेगळ्या रकमा ऑनलाइन माध्यमातून जमा करून घेण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण 45 लाख 50 हजार 197 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

₹45 lakh fraud under the pretext of ‘work-from-home’

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago