नाशिक

नाशिकमध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस

गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

सिडको : प्रतिनिधी
चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली असून, त्याच्या चौकशीतून मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
वेदांत संजय वावरिया (वय 18, रा. गिते मळा, शताब्दी हॉस्पिटलच्या मागे, हेरिबेअर सोसायटीजवळ, मुंबई नाका, नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना एक तरुण चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
ही माहिती युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या आलेल्या वावरिया याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने अ‍ॅक्टिव्हा मोपेड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून सुमारे 25 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा मोपेड जप्त
करण्यात आली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीला आणि जप्त मुद्देमालाला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Motorcycle theft case solved in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago