नाशिक

अघोरी पूजेसाठी उकळले एक लाख 60 हजार

जबरदस्तीने साखरपुडा करणार्‍या महिला मांत्रिकास अटक

नाशिक : प्रतिनिधी
आजारपण व संकटमुक्तीचे आमिष दाखवून एका गरीब महिला मजुराकडून अघोरी पूजेच्या नावाखाली एक लाख 60 हजार रुपये उकळल्याचा आणि तिच्या 21 वर्षांच्या मुलीचा स्वतःच्या मुलाशी बळजबरीने साखरपुडा उरकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मदतीने नाशिकच्या संशयित महिला मांत्रिक सरिता मनोज जाधव व तिच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
धुळे येथील एका आजारी मजूर महिलेची ओळख दोन मैत्रिणींमार्फत नाशिकच्या सरिता जाधव या मांत्रिकाशी झाली. मांत्रिकेने अंगावरून लिंबू फिरवून राखमिश्रित पाणी पाजले आणि स्मशानातील पूजेच्या नावाखाली पीडितेकडून सुरुवातीला एक लाख 30 हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर 14 जुलै 2026 रोजी नाशिकच्या गोदाघाटावरील केवडीबन येथे पीडितेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळून अघोरी विधी केला व मुंबई नाका येथील घरी नेत आणखी 30 हजार रुपये उकळले.
घरातील संकट टळेल अशी भीती दाखवून मांत्रिकेने पीडितेच्या मुलीला धुळ्यातील एका मैत्रिणीकडे 40 दिवस वेगळे ठेवले आणि 24 जुलै 2026 रोजी तिचा साखरपुडा स्वतःचा मुलगा गणेश मनोज जाधव याच्याशी जबरदस्तीने करून घेतला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने ‘अंनिस’चे रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील व नितीन बागूल यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने 27 सप्टेंबर 2026 रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
धुळे पोलिसांनी नाशिकमधून आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे पुढील तपास करत आहेत.

 

1.6 lakh boiled for Aghori ritual

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago