नाशिक

शहरात एक लाख 67 हजार पाणीमीटरचे काटे बंद

पाणी जिरतेय कुठे?; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

नाशिक : प्रतिनिधी
शहरात नागरिकांना पुरवल्या जाणार्‍या प्रत्येक थेंबाचा हिशेब लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आउटसोर्सिर्ंगच्या माध्यमातून पाणीमीटरचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणातून शहरातील एक लाख 67 हजार 881 पाणीमीटर कोणत्या ना कोणत्या कारणाने नादुरुस्त आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मनपाकडे दोन लाख 20 हजार 307 पाणीमीटरची अधिकृत नोंद असताना सर्वेक्षणात 29 हजार 349 मीटर अनधिकृतरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरवात केली आहे.
नोव्हेंबर 2024 पासून पाणीमीटर तपासणीचे काम पुण्याच्या कॅनबेरी संस्थेला दिले आहेत. नागरिकांना दिल्या जाणार्‍या पाण्याचा हिशेब पारदर्शकतेने लागावा यासह बिले वाटप व अनधिकृत नळजोडणी शोधणे आणि पाणीमीटरची तपासणीचे काम या संस्थेकडून केले जात आहे. सध्या शहरात फक्त 81 हजार 875 एवढेच पाणीमीटर सुरू आहेत. या संस्थेकडून वॉटर मीटरचे रीडिंग घेऊन अ‍ॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना स्पॉट बिलिंग दिले जात आहे. शहरातील 40 टक्के पाण्याचा हिशेब लागत नसल्याचे वॉटर ऑडिटच्या अहवालातून यापूर्वी समोर आले होते. पाण्याचा अपव्यय, चोरी व गळती थांबविण्याकरिता मनपाने पाणी मीटरच्या तपासणीचे काम हाती घेतले आहे. पाण्याची देयके देण्यासाठी कर विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने पाणीपट्टी देयके देण्यास विलंब होत असल्याचे चित्र होते. पण आता स्पॉट बिलिंगचे काम शहरभर सुरू आहे. सहा विभागांत 40 महिलांची पथके काम करीत आहेत. यापूर्वी नागरिकांना पाणीपट्टीचे बिल वेळेत जात नसल्याने त्याचा महसुलावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. शहरातील नादुरुस्त पाणीमीटर नव्याने बसविणे, अनधिकृत मीटरचा शोध लागावा, याशिवाय पाण्याचा हिशोब लागावा, या उद्देशाने खासगी संस्थेला सर्वेेक्षणाचे काम दिले आहे.

शहरातील सर्व पाणी मीटरची तपासणी केली जात आहे. मीटर नादुरुस्त असल्यास ते बदलून घेण्याच्या सूचना नागरिकांना केल्या जात आहेत. नागरिकांनी सहकार्य करून नादुरुस्त मीटर बदलून घ्यावेत.
– नितीन पवार, उपायुक्त, कर विभाग, मनपा

167,000 water meters in the city have stopped recording usage.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago