राज्यात 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के पाणीकपात जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
अल निनोचा फटका आणि कमी पर्जन्यमानामुळे राज्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट घोंघावू लागले आहे. त्यामुळेच सरकारने कठोर पावले उचलली आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जाहीर केले की, 16 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये किमान 10 टक्के पाणीकपात लागू होणार आहे. तसेच प्रत्येक धरणात 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल एवढा पिण्याचा पाणीसाठा राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले
आहेत.
राज्यातील एकूण धरणसाठा गेल्या वर्षीच्या 89% च्या तुलनेत यंदा फक्त 74% वर आला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागात तर 44% च पाणी शिल्लक आहे. ही स्थिती पाहता सरकारने वॉर-लेव्हलवर नियोजन सुरू केले आहे. बाष्पीभवन, गाळ आणि चोरीचा पाणीउपसा लक्षात घेऊन प्रत्येक धरणात 10 टक्के आपत्कालीन साठा राखीव ठेवला जाणार आहे. गरज पडल्यास मृतसाठ्यातील पाण्याचाही वापर केला जाईल.
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये आधीच दुष्काळ जाहीर झाला असून अल-निनोचा प्रभाव पुढील वर्षभर राहण्याची भीती हवामान विभाग(आयएमडी)ने व्यक्त केली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महाजन यांनी केले
आहे.

10% water cut announced in the state starting October 16.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *