नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये देशभरात 100 नवीन विमानतळ उभारण्यास मंजुरी, उडान 2.0 योजनेचा विस्तार, तसेच परदेशी नागरिकांच्या व्हिसा आणि ट्रॅकिंग प्रणालीची योजना 2031 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने देशभरात 100 नवीन विमानतळ उभारण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येक विमानतळासाठी सरासरी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पासाठी सरकारने 12,159 कोटी रुपयांचा बजेट निश्चित केला
आहे.
हे विमानतळ चॅलेंज मोडमध्ये उभारले जाणार आहेत. म्हणजेच, ज्या राज्य किंवा शहराकडून जमीन सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुविधा लवकर आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील, त्या ठिकाणांना विमानतळासाठी प्राधान्य दिले जाईल. सरकार देशभरात 200 नवीन आधुनिक हेलिपॅड उभारणार आहे. विशेषतः डोंगराळ भाग, ईशान्य भारत आणि बेट क्षेत्र, जिथे रस्ते बांधणे कठीण आहे, तिथे हेलिकॉप्टर हा मुख्य वाहतूक पर्याय बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी 3,661 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय भारतात तयार होणार्‍या विमानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन विमान खरेदीसाठी 400 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांच्या व्हिसा, नोंदणी आणि ट्रॅकिंगशी संबंधित योजना पुढील पाच वर्षांसाठी, म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी 1,800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, भारताची इमिग्रेशन आणि व्हिसा प्रणाली अधिक आधुनिक आणि सुरक्षित बनवणे हा यामागील उद्देश आहे.

उडान योजना विस्तार
देशातील लहान शहरांना हवाई सेवेशी जोडण्यासाठी सुरू असलेली उडान योजना आता पुढील दहा वर्षांसाठी (2036 पर्यंत) वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकार 28,840 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक स्वस्त आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

पर्यावरणाबाबतही महत्त्वाचा निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025 ते 2035 या कालावधीसाठी भारताचे नवीन पर्यावरण लक्ष्य मंजूर केले आहे. या निर्णयाचा उद्देश प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, हा आहे.

100 new airports, 200 helipads in the country

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago