तरुणीची फिर्याद; खरातचा आणखी कारनामा उघड
सिडको : विशेष प्रतिनिधी
करिअरचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी शिर्डी येथे पीडित तरुणीने नवीन एफआयआर दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील धक्कादायक बाबी पुन्हा समोर येत आहेत.
खरात याला पोलिस कोठडी वाढविण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला मिरगाव येथे घेऊन जात फार्महाउसची झडती घेतली. त्याचा कथित पीए रमेश हिंगे यानेही काल वृत्तवाहिन्यांवर आपला या प्रकरणाशी काही संबध नसल्याचा दावा केला.
दरम्यान, कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात आणखी एका पीडितेची तक्रार दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल झाले आहेत. आता पुन्हा दाखल होणार्या गुन्ह्यामुळे सातमध्ये एका नव्या गुन्ह्याची वाढ होणार आहे. त्यामुळे खरातच्या विरोधात दाखल होणार्या गुन्ह्याची संख्या वाढत जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात न्यायालयाने अशोक खरात याला रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान विविध धागेदोरे समोर येत असताना आता नव्या तक्रारीमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत खरातने चार वेळा तिच्यावर अत्याचार केला. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा तसेच घटनेची वाच्यता केल्यास दैवी शक्तीच्या नावाखाली आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कुटुंबीय शेतासाठी जागा पाहण्याच्या निमित्ताने खरातच्या संपर्कात आले होते. त्यानंतर शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी भेट दिली असता ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
इगतपुरी कनेक्शन
तपासादरम्यान खरातचे इगतपुरी तालुक्यातील कनेक्शन समोर आले आहे. नांदगाव बुद्रुक येथील एका भोंदूबाबाच्या घरी त्याचा नियमित वावर असल्याची माहिती समोर आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी धाड टाकून चौकशी सुरू केली आहे. या माध्यमातून गंडेदोरे, अंगठ्या आदींचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सीएची चौकशी होणार
आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू असून, पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंटचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित व्यक्तीने खरातच्या ‘ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’मध्ये विश्वस्त म्हणून काम पाहिले असून, आर्थिक व्यवहारांची माहिती त्याच्याकडे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, निधीचे स्रोत आणि कथित आर्थिक गैरव्यवहार याबाबतही तपासाचा फोकस वाढवण्यात आला आहे.खरातच्या कथित गैरप्रकारांमधील आर्थिक बाजू, तसेच महिलांच्या शोषणाच्या आरोपांचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहेत. पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sexual harassment instead of career guidance
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…