महाराष्ट्र

समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध

फडणवीस : अधिवेशनात खरात प्रकरणावर आक्रमक भाष्य

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी, 25 मार्च रोजी, अखेरचा दिवस होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियम 293 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले की, देशाला नव्हे, तर जगाला हेवा वाटावा असा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे.
या राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही, केवळ प्रगती नांदेल. संविधान सगे आणि राज्याची 13 कोटी जनता सोयरे असल्याच्या भावनेतून सर्वोत्तम महाराष्ट्र निर्माण होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, अधिवेशनाच्या या अखेरच्या दिवशी सर्वाधिक गाजला तो नाशिकच्या भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणावरील मुख्यमंत्र्यांचा विस्तृत व आक्रमक खुलासा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात खुलासा केला की, अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत एकूण 8 एफआयआर समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शासन कटीबध्द
दाखल झाले असून यातील 7 प्रकरणे एसआयटी कडे वर्ग करण्यात आली आहेत. आरोपी 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत होता, आता नाशिक न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मुदतवाढ दिली आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की, नीरज जाधव नामक व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तिचा एआय-जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. या तपासादरम्यान खरातचा सहकारी योगेश भालेराव याने पोलिसांना 35 व्हिडिओ दाखवले, ज्यात खरात 8 वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार करताना दिसत होता. फडणवीस विधानसभेत म्हणाले, जर ट्रम्पने अशोक खरातला सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले असते, तर त्याने सांगितले असते की युद्ध ड्रोनने नाही, तर ’मंत्र-तंत्राने’ लढवा! – या टोमण्याने सभागृहात हास्याची लकेर उमटली आणि भोंदूगिरीची खिल्ली उडाली. विरोधकांनी खरात आणि राजकीय नेते व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील कथित संबंधांवर प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले की महिला अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि कोणाचीही गय केली जाणार नाही. फक्त जे खरोखरच निर्दोष असतात, त्यांनाच क्लीन चिट मिळते, हे त्यांचे शब्द विरोधकांना थेट उत्तर होते.
राजकीय दुव्यांवर मौन – विरोधकांचा तीव्र आक्षेप
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरातकडून जप्त केलेल्या 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओंचा उल्लेख करत, वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याच्या अटकेस प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि राज्याची प्रतिमा धोक्यात आल्याचे म्हटले. स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव नाकारला, पण सदस्यांना मत मांडण्याची परवानगी दिली. वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दांत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अशा भोंदूंना राजकीय आणि प्रशासकीय संरक्षण मिळत असेल, तर ते राज्याच्या प्रतिमेसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. अंधश्रद्धाविरोधी कायदा होऊन 12 वर्षे उलटली, पण त्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी नियम अजूनही तयार झाले नाहीत. फडणवीस यांनी पलटवार करताना विचारले की, खरातच्या ’शिवानिका संस्थान’ ट्रस्टला 40 किलोमीटर लांब पाइपलाइन देण्याचा आदेश कोणत्या सरकारच्या काळात आणि कोणी दिला होता? – हा टोला थेट उद्धव ठाकरे यांच्या ’महाविकास आघाडी’ सरकारला होता.
महायुती एकता, सभापती अधिकारांवर मांडणी
कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे आणि शहरी भागातील गुन्हेगारीत राज्यातील एकही शहर देशातील पहिल्या दहा क्रमांकात नाही; राज्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सातत्याने काम सुरू आहे. महायुती सरकारच्या एकजुटीबाबत विचारले असता, फडणवीस यांनी ठणकावले की, कितीही काड्या टाकण्याचा प्रयत्न झाला, तरी महायुतीत सगळे आलबेल आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे दिलेले निर्देश आणि सभापती-उपसभापतींच्या अधिकारांच्या मर्यादेवर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, सभापतींचे निर्देश अंतिम किंवा ’ब्रह्मवाक्य’ मानता येणार नाहीत; विधिमंडळ आणि कार्यपालिका यांचे अधिकार स्वतंत्र आहेत आणि कार्यपालिकेच्या अखत्यारीत येणारे निर्णय कार्यपालिकाच घेईल. अधिवेशनाचा समारोप करताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, 13 कोटी महाराष्ट्रवासीयांना न्याय देणे, गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात पकडणे आणि प्रगतीचे दरवाजे खुले ठेवणे – हेच महायुती सरकारचे संकल्प आहेत. अधिवेशनात भोंदूबाबा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असले, तरी खरात प्रकरणावर कठोर कारवाईचे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा शेवट राज्यहिताची भाषा बोलत केला.

मालमत्तेची छाननी सुरू
खरातविरोधातील तपासात पोलिसांनी मिरगाव येथील त्याच्या फार्महाउसमध्ये झडती घेऊन दोन लॅपटॉप, एक डीव्हीआर, एअर रिव्हॉल्वर, 21 जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य जप्त केले. त्याचे मोबाईल सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, खरातशी संबंधित सुमारे 40 कोटींच्या मालमत्ता निश्चित करण्यात आल्या आहेत, यात 33 एकर जमीन, फार्महाउस, प्लॉट्स, पुण्यात मुलीच्या नावावरील फ्लॅट, पनवेलमधील जमीन आणि सिन्नरमधील मंगल कार्यालयाचा समावेश आहे. नातेवाइकांच्या नावावरील मालमत्तांचीही छाननी सुरू आहे.

Government committed to creating a prosperous Maharashtra

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago