नाशिक

‘एसएमबीटी’त आधुनिक संशोधनासह 100 टक्के प्लेसमेंट

नाशिक : प्रतिनिधी
संशोधन, जागतिक दर्जाचे शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीच्या बळावर एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देत जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय आघाडीवर आहे.
महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच 1200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय असल्याने विद्यार्थ्यांना क्लिनिकल फार्मसीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा आणि आधुनिक उपकरणांच्या मदतीने 500 हून अधिक संशोधन पेपर्स, 70+ स्कोपस आर्टिकल्स आणि 30 पेक्षा अधिक पेटंट्सची नोंद झाली आहे. चालू वर्षात 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून, अनेकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. महाविद्यालयाचे थायलंड, यूएई, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, फिलिपीन्स आणि व्हिएतनाममधील 10 हून अधिक संस्थांशी शैक्षणिक करार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्टडी टूर तसेच विशेष शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे.
येथे मान्यताप्राप्त पीएच.डी. सेंटर असून, 13 पेक्षा अधिक पीएच.डीधारक प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. जीपॅट व नायपर परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी जिम, योगा, झुंबा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सायको-सोशल सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे. हॉस्टेल, नाईट लायब्ररी, 10 हजारांहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय, प्लास्टिक व वाहनमुक्त कॅम्पस, बॅटरी बग्गी आणि सायकल सुविधा यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण मिळते.

उद्योजकतेचे प्रशिक्षण

दर्जेदार शिक्षण आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या सहकार्यामुळे महाविद्यालयाने 100 टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये वार्षिक साडेतीन लाख ते 9 लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजवर संधी मिळत आहे. याशिवाय, ’स्टार्टअप इन फार्मसी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या तीन नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सवर काम सुरू असून, संशोधनासाठी झेब्राफिश स्टडी सेटअप आणि 300 हून अधिक औषधी वनस्पतींचे हर्बल गार्डनही उपलब्ध आहे.

सक्षम संशोधक घडविण्यासाठी प्रयत्न
परदेशी विद्यापीठांसोबतच्या करारांमुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती प्रत्यक्ष अनुभवता आली. हा अनुभव त्यांच्या करिअरला एक नवी आणि सक्षम दिशा देणारा ठरत आहे. आम्ही केवळ संशोधन करत नसून, जागतिक आव्हानांना तोंड देऊ शकतील असे सक्षम संशोधक घडवत आहोत. – डॉ. योगेश उशीर, प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी

100 टक्के प्लेसमेंटची परंपरा
या सर्व सोयीसुविधा आणि दर्जेदार शिक्षणामुळेच महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत 100% प्लेसमेंटची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. नामांकित कंपन्यांमधील इंडस्ट्रियल टाय-अप आणि रिक्रूटमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना किमान साडेतीन लाख रुपये ते कमाल 9 लाख रुपये प्रति वर्ष या सुरुवातीच्या पॅकेजने मोठ्या पदांवर नियुक्त केले गेले आहेत.
– प्राजक्ता शिंदे, प्लेसमेंट ऑफिसर, एसएमबीटी कॉलेज

100 percent placement with modern research in ‘SMBT’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago