मनपा आयुक्तांच्या आदेशाला ठेकेदारांची केराची टोपली
सिडको : प्रतिनिधी
नाशिक महापालिका हद्दीमध्ये नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न आता नाशिककर नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. कारण महानगरपालिका आयुक्तांचे आदेशच संबंधित विभाग आणि ठेकेदारांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. एमएनजीएल कंपनीसह पालिकेच्या बांधकाम, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे शहरभर खड्डे पडले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील विविध भागांत रस्ते, पाइपलाइन आणि अन्य विकासकामांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे सुरू करून ती अपूर्णावस्थेतच सोडली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन तसेच कुंभमेळा प्राधिकरणाकडे वारंवार केल्या आहेत. तथापि, या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांची गैरसोय
कायम आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांचा वेग वाढविण्यात आला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील अनेक रस्ते उखडलेल्या अवस्थेत असल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. महिनाभरापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी 31 मेनंतर कोणत्याही परिस्थितीत नवीन खोदकाम होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सुरू असलेल्या कामांवरील खोदकाम थांबवून पॅचवर्क आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या या आदेशानंतरही शहरातील अनेक भागांत खोदकाम सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मखमलाबाद रोडवरील शांतीनगर, गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसर, चांडक सर्कलजवळील रस्ता तसेच अन्य अनेक ठिकाणी उघडपणे खोदकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका प्रशासन, संबंधित विभाग आणि विविध प्राधिकरणांना आयुक्तांचे आदेश माहिती असतानाही सुरू असलेली कामे थांबविण्याची किंवा तातडीने पॅचवर्क करण्याची कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयुक्तांंच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरभर पडलेले खड्डे, रखडलेली कामे आणि वाढती गैरसोय यामुळे नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी होत आहे. आयुक्तांचे आदेश कागदावरच राहणार की त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
Open excavation continues in the city despite ban
सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…