नाशिक

राज्यातून 13,772 शेतकरी करणार डाळिंब निर्यात

अतिवृष्टीचा बागांना फटका; जिल्ह्यात 15 जणांची नोंदणी

लासलगाव : समीर पठाण
राज्यात यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका डाळिंबबागांना बसला. परिणामी उत्पादन व दर्जेदार फळे कमी प्रमाणात हाती लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीतही शेतकर्‍यांनी डाळिंबाच्या निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आतापर्यंत 13 हजार 772
शेतकर्‍यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. आणखी संख्यावाढीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातून गेल्या वर्षी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी सुमारे 22 हजार शेतकर्‍यांनी (मार्चपर्यंत) नोंदणी केली होती. गेल्या वर्षभरात सुमारे 19,676 टन डाळिंब निर्यात झाली होती. वास्तविक, गेल्या तीन ते चार वर्षांपासून डाळिंबावर नैसर्गिक संकटांची मालिका सुरू असतानाही शेतकरी निर्यातीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. युरोपियन देशासह आखाती, बांगलादेशात निर्यात मोठ्या प्रमाणात होते.
राज्यातून यंदाच्या हंगामात डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू आहे. 11 हजार 27 शेतकर्‍यांनी निर्यातीसाठीच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे. दोन हजार 724 शेतकर्‍यांनी नवीन परवाने घेतले आहेत. यंदा मेपासून सुरू असलेल्या पावसाने डाळिंबाच्या हंगामाचे नियोजन विस्कळीत केले. त्यातूनही शेतकर्‍यांनी बागांचा बहर धरला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्राची

महाराष्ट्रापेक्षा या राज्यांतून निर्यात करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमीच असते. यंदाच्या हंगामातही अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांतून एकूण 13 हजार 824 शेतकर्‍यांनी आतापर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. अर्थात, महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी झाली असल्याचे ’अपेडा’च्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. राज्यातील डाळिंबाला जगातील बाजारपेठेत मोठी मागणी असते.

जिल्हानिहाय झालेली नोंदणी
अहिल्यानगर                 699
छ. संभाजीनगर             14
बुलडाणा                        03
धुळे                               29
जळगाव                        14
नाशिक                         15
पुणे                              2,285
सांगली                         1,237
सातारा                         02
सोलापूर                       9,474
एकूण                           13,772

13,772 farmers from the state will export pomegranates
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago