नाशिक

निफाड शहरासह तालुका गारठला

तापमानाचा पारा 5.4 अंशांवर

निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढला असतानाच शुक्रवार (दि. 19) निफाड कृषी संशोधन केंद्रावर 5.4 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. अवघा तालुका गारठला आहे. थंडीची वाढती तीव्रता बघता पुढील काही दिवस या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा गत दोन महिन्यांपासून तापमान सरासरी सहा अंशांवर स्थिरावले असून, आता तापमान त्यापेक्षाही कमी झाले आहे. दररोज सकाळ सायंकाळ नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यामुळे थंडीत वाढ झाली आहे. पुढील पंधरा दिवस थंडीचा माहोल कायम राहील, असा अंदाज आहे.
वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी पोषक ठरत आहे. द्राक्षबागेसाठी मात्र हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचावासाठी तरुणाई सायंकाळी शेकोटीची आधार घेऊ लागली आहे. साहजिकच मागील आठवडाभराचा कालावधी पाहिला, तर तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत असल्याचे दिसत आहे.

यंदा परतीच्या दीर्घकाळ लांबलेल्या पावसाने हातात
आलेली खरिपासह रब्बी हंगामातील पिके वाया गेली. आता पावसाळा संपल्याने निदान फळबागा आणि भाजीपाला पिके व्यवस्थित येतील, अशी अपेक्षा होती. मात्र आताची थंडी बघता यात आणखी वाढ झाली, तर दवबिंदू गोठणे, द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने करपणे याबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
– सोपान खालकर, शेतकरी, भेंडाळी

The lowest temperature recorded at the Naphad Agricultural Research Station was 5.4 degrees Celsius.


 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago