नाशिक

अठरा हजार खड्डे बुजविले; मनपाच्या बांधकाम विभागाचा दावा

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरून गणपती बाप्पांचे आगमन खड्डेमुक्त रस्त्यांवरून व्हावे, याकरिता महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवार(दि.5)पर्यंत शहरातील 22 हजारांपैकी 18 हजार 423 खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, दररोज कुठेना कुठे अपघात होत आहेत. महापालिकेने रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत 18 हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शहरात अद्याप खड्ड्यांचे साम्राज्य असून, प्रशासनाने खोटे आकडे देऊन धूळफेक करू नये, असा आरोप नागरिक करत आहेत.
शहरात जूनपासून खड्डे बुजविले जात आहेत. मुख्य रस्ते, वाहतुकीची जास्त वर्दळ असलेले मार्ग आणि नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या ठिकाणांना प्राधान्य दिले जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहनांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी होत आहे. कागदोपत्री खड्डेमुक्ती आणि प्रत्यक्षातील विदारक रस्ते यात तफावत असल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने खड्डे दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विभाग                दुरुस्ती केलेले खड्डेे               दुरुस्ती करावयाचे खड्डे
नाशिक पूर्व                   1936                                     324
पश्चिम                         1253                                     226
पंचवटी                         5145                                    1385
नाशिकरोड                   2508                                    304
सातपूर                        2226                                    580
नवीन नाशिक             5003                                    821
एकूण                         18,423                                 3,640

18,000 potholes filled; Municipal Corporation’s Construction Department claims.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 days ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 days ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 days ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 days ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 days ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 days ago