नाशिक

येवल्यात सुखजित बायोकॉर्नची 760 कोटींची गुंतवणूक

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील येवला एमआयडीसी क्षेत्रात कृषिआधारित अत्याधुनिक अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे 760 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. दररोज 1200 टन मका प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याच्या उद्योग विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात हा करार झाला. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, माजी खासदार समीर भुजबळ, सुखजित बायोकॉर्न लिमिटेडचे उपाध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी कंपनीने शासनाकडे सुमारे 150 एकर जमीन, दररोज पाच एमएलडी प्रक्रिया पाणी, सहा मेगावॉट वीजजोडणी आणि आवश्यक रस्तेजोडणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या प्रकल्पाचा मेगा प्रकल्पात समावेश करण्याबाबतचे ऑफर लेटरही उद्योग विभागाकडून कंपनीला देण्यात आले आहे. प्रस्तावित प्रकल्पात मक्यापासून स्टार्च, तसेच त्यापासून तयार होणार्‍या विविध उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे 3.50 लाख टन मक्याची मागणी निर्माण होणार असल्याने नाशिक जिल्ह्यासह परिसरातील मका उत्पादक शेतकर्‍यांना स्थिर आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतीमालाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन होऊन कृषी आणि उद्योग क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.
या प्रकल्पाचे काम 12 ते 15 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. उद्योगामुळे सुमारे एक हजार प्रत्यक्ष आणि तीन हजारांपर्यंत अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूक, साठवणूक, पॅकेजिंग, देखभाल आणि अन्य पूरक सेवांनाही यामुळे चालना मिळू शकते.

चार हजार रोजगारांची शक्यता
या प्रकल्पातून सुमारे एक हजार प्रत्यक्ष, तर तीन हजारांपर्यंत अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येवला परिसरातील तरुणांसह वाहतूक, लॉजिस्टिक आणि सेवा क्षेत्रालाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध
होणार आहेत.

मक्याला मिळणार हक्काची बाजारपेठ
दरवर्षी 3.50 लाख टन मक्याची मागणी निर्माण होणार असल्याने मका उत्पादकांना स्थानिक पातळीवर मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया उद्योगामुळे कच्च्या मालाचे मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतर होणार आहे.

12 ते 15 महिन्यांत प्रकल्प उभारणी
या प्रकल्पासाठी जमीन, पाणी, वीज आणि रस्तेजोडणीसारख्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. कंपनीने प्रकल्पाचे काम 12 ते 15 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. मेगा प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास गुंतवणुकीला अतिरिक्त प्रोत्साहन व सवलती मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

Sukhjit Biocorn’s ₹760 crore investment in Yeola

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 days ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 days ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 days ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 days ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 days ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 days ago