नाशिक

नेपाळमध्ये अडकलेले नाशिकचे 200 यात्रेकरू परतले

सिडको : प्रतिनिधी
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडकलेले नाशिकचे 200 यात्रेकरू सुखरूपपणे नाशिकमध्ये परतले. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या नियोजनामुळे सर्व यात्रेकरू सुरक्षित राहिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दत्त महाराजांच्या पादुकांसह तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे 200 भाविक नेपाळ यात्रेला गेले होते. यात्रेदरम्यान नेपाळमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रस्टच्या सेवेकर्‍यांनी प्रसंगावधान राखत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सर्व भाविक सुरक्षित राहिले.
यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती नाशिकमधील कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला. मंगळवारी, दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता सर्व 200 यात्रेकरू नाशिकमध्ये दाखल झाले.

मुंबई नाका येथे यात्रेकरूंचे स्वागत
यात्रेकरू नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मुंबई नाका येथे ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. वाद्यांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत तसेच दत्तगुरूंच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी जल्लोष केला. मुंबई नाका ते कालिका मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक कुटुंबीयांनी आपल्या आप्तस्वकीयांचे आनंदाने स्वागत केले.

200 pilgrims from Nashik stranded in Nepal have returned.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

17 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

17 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago