14 तास अखंड कीर्तनाचे आयोजन
नाशिक : प्रतिनिधी
भगवान श्रीकृष्णांचा पावन जन्मोत्सव इस्कॉन नाशिकच्या जनार्दन वैद्यनगर, हरे कृष्ण मार्ग येथील श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात दि. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी साजरा होणार असून, उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनचे वरिष्ठ प्रचारक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार चैतन्य चरणदास यांची विशेष कृष्णकथेसाठी उपस्थिती लाभणार आहे. यावेळी दि. 6 सप्टेंबरपर्यंत पाच दिवसीय विशेष कृष्णकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 4, 5 व 6 रोजी सकाळच्या सत्रात कथा होणार आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी 4 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता मंगल आरतीने उत्सवाला प्रारंभ होईल. सकाळी 6 वाजता हरे कृष्ण महामंत्र जप व श्रीमद्भागवत प्रवचन होईल. दिवसभर श्री श्री राधा मदन गोपालजींचे दर्शन घेता येणार असून, मंदिरात सलग 14 तास अखंड कीर्तन होणार आहे. मंदिर परिसर, मुख्य वेदी आणि विग्रहांची सुवासिक फुलांनी सजावट व विद्युत रोषणाई करण्यात
येणार आहे.
रात्री 11 वाजता श्री राधा-कृष्णाच्या उत्सव विग्रहांचा पंचामृत व विविध फळांच्या रसांनी अभिषेक होईल. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून मध्यरात्री 12 वाजता कृष्ण जन्ममुहूर्तावर मुख्य महाआरती होईल. 5 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पारंपरिक नंदोत्सव तसेच इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांचा आविर्भाव महोत्सव साजरा होईल. इस्कॉन यूथ सर्व्हिसच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरणा, तर युवतींसाठी चेतना उपक्रमांसह धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक साहित्याचे स्टॉल उभारले जाणार आहेत. उत्सवकाळात भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
Krishna Janmotsav begins today at the ISKCON temple.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…