नाशिक

जिल्ह्यासाठी केरोसिनचा 2,28,000 लिटर कोटा

मार्च-एप्रिलसाठी नियतन आदेश जारी

जिल्ह्यातील आकडेवारी            

अंत्योदय शिधापत्रिकाधारक – 1,72,298          
प्राधान्य शिधापत्रिकाधारक -7,12,432
एकूण शिधापत्रिकाधारक -8,83,730
तहसीलदारांनी नोंदवलेली मागणी-39,68,993
होणारे वितरण-2,28,000

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात वाढत्या एलपीजी गॅस कनेक्शनमुळे गेल्या काही वर्षांपासून केरोसिनचे वितरण मर्यादित करण्यात आले होते. मात्र, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने राज्यासाठी केरोसिनचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी मार्च-एप्रिल 2026 या कालावधीत 228 किलो लिटर केरोसिन नियतनाचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे.

केंद्र शासनाने 12 मार्च 2026 रोजी राज्यासाठी 3,744 केएल केरोसिन मंजूर केले असून, त्यातून जिल्हानिहाय वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय मागणीचा आढावा घेऊन वितरणाचे नियोजन निश्चित केले आहे.
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिरिक्त केरोसिन कोटा नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरणार असून, ग्रामीण व गरजू भागातील कुटुंबांना याचा विशेष फायदा होणार आहे. सर्व तहसीलदार व धान्य वितरण अधिकार्‍यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नियमित तपासणी, अहवाल सादरीकरण व नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे.

प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन

वितरणाचे नियम

जिल्हा प्रशासनाने केरोसिन वितरणासाठी कडक नियमावली लागू केली आहे. केरोसिनचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करण्यास परवानगी असेल. परवानाधारक विक्रेत्यांनी दर 7 दिवसांनी साठा, वितरण व शिल्लक यांची नोंद सादर करणे बंधनकारक राहील. केरोसिन टँकरची वाहतूक, उतराई व वितरणाची तपासणी तहसीलदार व धान्य वितरण अधिकार्‍यांकडून केली जाईल. कोणत्याही प्रकारचा गैरवापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय नियोजन

जिल्ह्यातील येवला, निफाड, चांदवड, बागलाण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर, देवळा, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ तसेच नाशिक व मालेगाव धान्य वितरण विभागांमार्फत केरोसिनचे वितरण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय मागणी आणि शिधापत्रिकांच्या संख्येनुसार कोटा निश्चित करण्यात आला आहे.

अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य
या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका 3 लिटर केरोसिन देण्यात येणार आहे. वितरण करताना अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारकांनाही केरोसिन दिले जाईल. विशेष म्हणजे, शिधापत्रिका नसलेल्या गरजू कुटुंबांनाही ग्रामपंचायतीच्या दाखल्यावर केरोसिन मिळू शकते. स्थलांतरित मजूर व इतर गरजू घटकांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

 

 

2,28,000 liters quota of kerosene for the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago