पालिकेची धडक कारवाई; आठवडे बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप
येवला : प्रतिनिधी
नगरपरिषद येवला व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठवडे बाजारात अहिल्यानगर- मनमाड महामार्गावरील फळ विक्रेते तसेच शनी पटांगण येथील पथविक्रेत्यांवर येवला नगर परिषदेतर्फे प्लास्टिकविरोधी मोहीम हाती घेण्यात आली.
मोहिमेचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे यांनी व्यावसायिकांकडून प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई करत पस्तीस किलो प्लास्टिक जप्त केले.
राज्यात प्लास्टिकबंदी असताना येवला शहरात सर्रास प्लास्टिक विक्री होत असताना त्या व्यवसायाकडून प्लास्टिक जप्त करण्यात आले. दरम्यान पालिकेतर्फे आठवडे बाजारातील नागरिकांना प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप केले.
या मोहिमेत शहर समन्वयक गौरव चुंबळे, स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे, प्रकल्पाधिकारी शीतल शेळके, नितीन कालांक, साहिल गोसावी, प्रभाकर वाघ, अच्युत शिंत्रे आदी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (5 जून) शहरात प्लास्टिकबंदी कारवाई सुरू आहे, तसेच यापुढे स्वच्छ येवला सुंदर येवला यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, व्यावसायिकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करवा.
-तुषार आहेर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, येवलाकारवाईनंतर व्यावसायिकांकडे परत प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड, दुसर्यांदा आढळून आल्यास दहा हजार रुपये आणि तिसर्यांदा आढळल्यास 25 हजार रुपये दंड व तीन महिन्यांची शिक्षादेखील केली जाईल.
– पूनम भामरे, स्वच्छता निरीक्षक, नगरपरिषद, येवला
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…