धरण समूहात अवघा 29 टक्के पाणीसाठा
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील 354 गावांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली असून, सुमारे दोन लाख 12 हजार 89 लोकसंख्येला प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी 125 टँकर कार्यरत असून, दररोज 256 फेर्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पोहोचविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने टँकरची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या प्रमुख धरण समूहांत सध्या केवळ 29 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर धरणात 40.25 टक्के साठा आहे. मात्र, पाण्याची आवक थांबलेली असताना वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणीवापर टाळावा, गळती रोखावी आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा तुलनेने परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी तापमानवाढ कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षीपेक्षा कमी टँकर
गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांना 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यंदा सध्या 125 टँकर कार्यरत आहेत. ही परिस्थिती काही प्रमाणात समाधानकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
टंचाईची आकडेवारी
टंचाईग्रस्त गावे – 354
प्रभावित लोकसंख्या – 2,12,089
कार्यरत टँकर – 125
दररोजच्या टँकर फेर्या – 256
धरण समूहातील पाणीसाठा – 29 टक्के
गंगापूर धरणातील पाणीसाठा – 40.25 टक्के
354 villages in the district are affected by water shortage
सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…
नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…
सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…
सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…