नाशिक

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे दागिने आणि रोकड असा सुमारे 36 लाख 50 हजारांंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रपालसिंग प्रीतमसिंग भामरे (वय 58, रा. सुचितानगर) यांच्या दीपहंस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. दुपारपासून दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याची नाणी, सोन्याचे कडे, चेन, नथ, चांदीची नाणी, वाट्या, पायल, बिछवे तसेच हिर्‍यांच्या अंगठ्या आणि पेंडण, असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.
याशिवाय घरातील मोठी रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे 36 लाख 60 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक पी. आर. पवार करीत आहेत.

36 lakhs looted in Suchitanagar house burglary

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago