नाशिक

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका शाळेच्या भिंतीजवळील कचराकुंडीत संशयास्पद स्थितीत अर्भक पडलेले असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अंबड एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार सोमनाथ झोले व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून अर्भक ताब्यात घेतले व रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर अर्भक मृत असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अर्भकाला अमानुष पद्धतीने कचराकुंडीत टाकून दिल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. अर्भक येथे कोणी आणून टाकले आणि त्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Newborn baby thrown in garbage bin in Ambad, anger among citizens

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago