नाशिक

चार हजार टन कांदा बाजारात; दरवाढीला ब्रेक नाही

17 शहरांत 35 रुपये किलो दराने विक्री; कांद्याचे किरकोळ दर वाढले

लासलगाव : वार्ताहर
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरविण्यास सुरुवात केली असली, तरी दरवाढीला अपेक्षित ब्रेक लागलेला नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा दिवसांत 17 शहरांमध्ये सुमारे चार हजार टन बफर कांद्याची विक्री केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून हा कांदा ग्राहकांना 35 रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे.
केंद्राकडे 2026 साठी सुमारे 1.21 लाख टन कांद्याचा बफर साठा आहे. वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादक राज्यांमधून हा कांदा प्रमुख ग्राहक बाजारपेठांमध्ये ट्रक तसेच ‘कांदा एक्स्प्रेस’च्या माध्यमातून पाठविला जात आहे.
मात्र, सरकारी हस्तक्षेपाचा बाजारभावावर अपेक्षित परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. 28 ऑगस्ट रोजी हस्तक्षेप सुरू झाला, त्यावेळी देशातील सरासरी किरकोळ कांदा दर सुमारे 48.50 रुपये किलो होता. दहा दिवसांनंतर तो 50.79 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हजारो टन बफर कांदा बाजारात उतरवूनही किरकोळ दरवाढ थांबलेली नाही.

शेतकर्‍यांचा सवाल

बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून ग्राहकांना दिलासा देण्याचे धोरण सरकार राबवत असले, तरी उत्पादक कांद्याच्या बाजारभावावर त्याचा परिणाम किती आणि कसा होतो, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. दर वाढले की, ग्राहकांच्या हितासाठी सरकारी हस्तक्षेप आणि दर घसरले की शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजार मोकळा, अशा धोरणाऐवजी कांद्याच्या बाजारासाठी दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात-विपणन धोरणाची गरज असल्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

आवक घटली, दरात पुन्हा तेजी

आशिया खंडातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्येही दरातील चढ-उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांत बाजारातील कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे वृत्त आहे. कमी आवक, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादनातील घट यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यापूर्वी सरकारी बफर कांदा दिल्लीकडे पाठविण्यासाठी लासलगावहून ‘कांदा एक्स्प्रेस’ रवाना करण्यात आली. मात्र, या कांद्याच्या गुणवत्तेवरून शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत रेल्वे रोखल्याची घटनाही घडली होती.

दरवाढीचे आव्हान

दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्येही कांद्याच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आहे. अलीकडेच लासलगाव बाजारातील कांद्याच्या सरासरी दर 4551 रुपये प्रतिक्विंटल आहे. सरकारी हस्तक्षेप, बफर स्टॉकची विक्री आणि साठेबाजीविरोधातील उपाययोजना करूनही बाजारातील अस्थिरता कायम आहे.

 

4,000 tonnes of onions arrive in the market; no let-up in price rise.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 days ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 days ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 days ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 days ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 days ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 days ago