नाशिक

देवगाव परिसरातील 5 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

चर ठरला कुचकामी : कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी

निफाड : तालुका प्रतिनिधी
दरवर्षी पावसाळ्यात नांदगाव डोंगरगाव, विंचूर, धारणगाव परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत येत असल्याने देवगाव, रुई, कोळगाव, खेडलेझुंगे, कानळद, परिसरातील सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रात हे पाणी साचते. परिणामी, या शिवाराला समुद्राचे स्वरूप प्राप्त होते. यापूर्वी हे पाणी काढून देण्यासाठी चर बनविण्यात आला. मात्र, तो चुकीच्या पद्धतीने बनविल्याने निरुपयोगी ठरला. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून हे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने जमीन असूनदेखील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत.
पावसाचे पाणी काढून देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. निफाडच्या पूर्व भागातील जमिनीचा उतार हा दक्षिण उत्तर असा असल्याने पावसाचे पाणी दक्षिण दिशेकडे वाहत येते. परिणामी, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद, खेडलेझुंगे ,शिरवाडे या गावांतील शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनीत हे पाणी साचते. दरवर्षीच पावसाळ्यात वाहत आलेले पाणी आणि परिसरातील ओहाळांचे येणारे पाणी देखील याच परिसरात येते. परिणामी, अगदी पुढील पावसाळ्यापर्यंत हे पाणी साचून राहते. गोदावरी नदीपात्रापर्यंत चराचे काम करणे गरजेचे आहे.
येथे साचलेल्या पाण्यामुळे ही संपूर्ण जमीन नापीक झाली असून, संपूर्ण शिवारात पाणीच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे येथे धरण आहे की सागर आहे, असा प्रश्न या परिसरात येणार्‍या पाहुणे मंडळींना पडत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी या समस्यांचा सामना करीत आहेत.अनेक पदाधिकारी, अधिकारी, मंत्री यांनी या परिसराची पाहणी केली. अगदी पाण्यातून चालत जाण्याशिवाय येथे दुसरा पर्याय नाही. अशी सर्व परिस्थिती असतानादेखील आतापर्यंत आश्वासनांचाच पाऊस भरपूर पडला. हे साचलेले पाणी काढून देण्याची ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी याबाबत आवाज उठवित आहेत. निवडणुकीच्या वेळी नेते हा प्रश्न भावनिक मुद्दा बनवितात. सत्ताधारी आणि विरोधक अशा सार्‍याच नेत्यांनी पाहणी केली आणि हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही या समस्येची पाहिजे तशी सोडवणूक झालेली नाही. परिसरातील शेतकर्‍यांनी देखील या प्रश्नी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. -निवृत्ती गारे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

5,000 hectares of land in the Devgaon area submerged.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago