नाशिक

दिंडोरीत गाळफेक मोर्चा

खड्ड्यांचे साम्राज्य; शरद पवार गटाकडून तीव्र निषेध

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तालुका आता ‘खड्ड्यांचा बालेकिल्ला’ बनल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, युवक तालुकाध्यक्ष मनोज खांदवे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या पायर्‍यांवर थेट गाळ ओतून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
नाशिक-दिंडोरी रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच तालुक्यातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोप्याचे सोंग घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या निष्काळजी कारभाराचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी थेट कार्यालयाच्या पायर्‍यांवर गाळ ओतण्याचे आंदोलन केले. प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे, शहराध्यक्ष सागर गुंबाडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सार्थक निखाडे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे, गोरख धात्रक, मयूर घरत, तेजस मुरकुटे, आदित्य मुरकुटे, अभिषेक मुरकुटे, संजय घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘Gaalphek’ (Silt-dumping) Protest in Dindori

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

20 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

20 hours ago