नाशिक

लासलगावसह सोळा गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

नांदूरमध्यमेश्वर धरणाची सचिवांनी केली पाहणी

लासलगाव: वार्ताहर
दारणा, गोदावरी, बाणगंगा व वालदेवी नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते. परिणामी, जलपंपाजवळ आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे लासलगाव शहरासह 16 गावांच्या पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला आणि अनेक गावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा लागला.
ना. छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी संरक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक महेश पैठणकर तसेच सोळा गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांच्या सूचनेनुसार नांदूरमध्यमेश्वर धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी
करण्यात आली.
यावेळी 16 गाव पाणीपुरवठा समितीचे सचिव संजय बाविस्कर यांनी धरणावरील व जलपंपावरील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्‍यांना सविस्तर अहवाल सादर केला. पाहणीनंतर महेश पैठणकर यांनी संबंधित विभागातील अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देऊन धरणाचे गेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. लासलगाव शहरासह सर्व भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

संबंधित यंत्रणेला सूचना

लासलगाव, पिंपळगाव नजीक, टाकळी, विंचूर, कोटमगाव व ब्राह्मणगाव या 16 गाव पाणीपुरवठा योजनेतील अनेक गावांमध्ये गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. चार-पाच दिवसांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी केवळ विंचूरपर्यंत पोहोचले, तर इतर अनेक गावांना पाणी मिळू शकले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन यावेळी ज्या गावांचा पाणीपुरवठा सर्वाधिक दिवसांपासून खंडित आहे तसेच योजनेच्या दूरच्या गावांना प्रथम प्राधान्याने पाणीपुरवठा करावा, अशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना आवाहन

इतर गावांनी आपल्या ग्रामपंचायतीमार्फत सहकार्याची भूमिका घेत, आवश्यकतेनुसार स्थानिक पाणीपुरवठ्यात समन्वय साधावा, जेणेकरून सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे सुरुवातीच्या काळात पाणी काही प्रमाणात गढूळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून तसेच शक्य असल्यास उकळून वापरावे, असे आवाहन 16 गाव पाणीपुरवठा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Water supply to sixteen villages, including Lasalgaon, will be streamlined.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago