महाराष्ट्र

पाळणा हलला पण जीव गमावला ,वर्षभरात प्रसूती दरम्यान 63 मातांचा मृत्यू

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस : माता मृत्यू घटल्याचा दावा

नाशिक ः देवयानी सोनार

बाळंतपण म्हणजे स्त्रीचा नवा जन्मच. प्रसूत कळा अनेकदा असह्य होऊन अचानक वाढणारा रक्तदाब,ऍनिमिया,रक्तस्त्राव आदी गोष्टींमुळे प्रसूतकाळात माता मृत्यू होतात. गेल्या तीन वर्षांत 240 महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे.

अनेकदा प्रसुतीपूर्व नंतर योग्य ती काळजी न घेतल्याने मृत्यू झाले आहेत मातामृत्यू घटविण्यासाठी जिल्हा आरोग्य रुग्णालयातर्ङ्गे विविध योजना राबविल्या जातात. तालुक्याच्या मुख्यालयात सिझेरियन सुविधा सुरू आहे.तसेच लक्ष कार्यक्रम अंतर्गत सन्मानपूर्व मातृत्व सेवा विषयक प्रशिक्षण पूर्ण  करण्यात आल्याचे जिल्हा आरेाग्य रुग्णालयाचे डॉ.अनंत पवार यांनी सांगितले.

दरवर्षी प्रसूती दरम्यान हजारो मातांचा मृत्यू होतो. याला अनेक घटक कारणीभूत असतात. जसे की, गर्भारपणात महिलेची योग्य काळजी न घेणं,  व्यवस्थित पोषण न झाल्यास, महिला अशक्त बनते, अशा महिलेची प्रसूती करण्यात अनेक धोके असतात. प्रसंगी महिलेचा जीव देखील जाऊ शकतो. मुल जन्माला आल्यानंतर देखील संबंधित महिलेची आणि बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मुलांचे पोषण व्यवस्थिीत झाले नाही तर बालके कुपोषित होतात.

गर्भारपणात आहार आरोग्याच्या तक्रारी तसेच व्यायाम शारीरिक हालचाल,मानसिक स्थिती याकडे वेळीच लक्ष न दिल्याने  प्रसुतीदरम्यान उच्च रक्तदाब तसेच हृदयाशी संबधीत आजारांमुळे मृत्यूचा धोका वाढतो.

प्रसूती दरम्यान मृत्यू
2020-21मध्ये 96
2021-22मध्ये 81
2022-23 मध्ये 63
तीन वर्षात 240 मृत्यू
जिल्ह्यात 2022 – 23 या वर्षात नैसर्गिक प्रसूती 22 हजार 146 आणि सिझेरियन 6हजार 465 प्रसूती झाल्या एकूण 28हजार 611 प्रसूती झाल्या. त्यापैकी 63 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला.
का साजरा करतात राष्टीय सुरक्षित  मातृत्व दिवस
महिलाच्या गर्भधारणेपासून ते बाळाला जन्म दिल्यानंतर आई आणि बाळाची काय काळजी घेतली जावी? यासाठी सरकारने तज्ज्ञांच्या मदतीने कार्यक्रमाची आखणी केली आहे. सरकारतर्फे मातांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सुविधांची त्यांना माहिती व्हावी, त्या सुविधांचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिल रोजी सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येततो

 

जिल्ह्यातील  आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित मातृत्व सेवा दिल्या जातात, तालुक्याच्या मुख्यालयात सिझेरियन सुविधा सुरू आहेत. तसेच लक्ष्य कार्यक्रमातर्ंगत सन्मान पूर्व मातृत्व सेवा विषयक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेलं असून त्यामुळे माता मृत्यू दर कमी झालेला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या रेफरल ऑडिटमुळे प्रसूती मातांना संदर्भित करण्याच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा झालेली आहे.

डॉ. अनंत  पवार
जिल्हा आरोग्य रुग्णालय नाशिक

Devyani Sonar

Recent Posts

नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात…

13 hours ago

सुला फेस्टचा समारोप

*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*…

2 days ago

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार ४५ प्रवासी जखमी. सुरगाणा : प्रतिनिधी वणी…

3 days ago

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

5 days ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

6 days ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

6 days ago