शहरातील अतिक्रमणांचे काय?



ञ्यंबकेश्वर

ञ्यंबकेश्वर शहराच्या विकास आराखडयात व्यवसायिक संकुल बांधकामासाठी आरक्षीत असलेल्या जागेवर जमीन मालकाने नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम केले म्हणून कारवाई होणार याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे या अनाधिकृत बांधकामाची मोघम तक्रार विचारात घेऊन नाशिकचे अप्पर जिल्हाधीकारी यांनी तत्परतेने कारवाई सुरू केली याबद्दल ञ्यंबक नगरीत त्यांचे अभिनंदन होत आहे.मात्र ञ्यंबकेश्वर शहरातील अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांची समस्या या एका कारवाईने निकालात निघाली असे म्हणने धाडसाचे ठरावे अशी शहाराची अवस्था झाली आहे.ञ्यंबकेश्वर शहर विकास आराखडयात आरक्षीत असलेले भुखंड आणि त्यावर बांधकाम झाले नाही याचा आढावा घेतला तर समुद्र मंथन होईल.शहरा विकास योजना लागु करण्यास उशीर झाला आहे.ऑगस्ट 1993 ची योजनेची मुदत 2013 मध्ये संपली.सुमारे 60 आरक्षणांपैकी अवघे दोन आरक्षीत भुखंड विकसीत केले.अर्थात त्याबाबतचे जमीन मालक आणि शासन यांचे वाद अद्याप सुरू आहे.नव्याने योजना करण्यास आणि तीचे सर्व सोपस्कार पूर्ण होण्यास 2022 साल उजाडावे लागले.20 वर्षांसाठी असलेले आरक्षीत भुखंड 30 वर्ष तसेच ठेवले.त्यानंतर नव्याने झालेल्या विकास योजनेत मागचे आरक्षीत भुखंड पुन्हा नव्याने आरक्षीत करण्यात आले आहेत.अर्थात यामध्ये काही आरक्षणे वगळण्यात आली.याबाबत अन्याय झालेल्या जमीन मालकांचे काहीही एक ऐकुन घेतले नाही.त्यातच कोणा एकाने बांधकाम असलेला भुखंड हस्तांतारीत केला.यावर तातडीने बांधकाम काढून टाकण्यासाठी नोटीसांचा भडीमार सुरू झाला आहे.यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे सर्वांना समान न्याय या तत्वाला थेट हरताळ फासला गेला आहे.

सप्टेंबर 2014 मध्ये महंत उदयगिरी महाराज आणि चंद्रकांत पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे याचिका दाखल केली.यामध्ये शहरात 3000 पेक्षा अधिक अतिक्रमीत आणि अनाधिकृत बांधकामांची यादी सादर करत कारवाईची मागणी केली.त्यास आता साडे आठ वर्षांचा कालावधी उलटला आहे.यासाठी जबाबदार असलेल्या संबंधीत अधिका-यांनी न्यायलयात हमीपत्र,प्रतिज्ञापत्र देण्यास विलंब करत मोठा कालापव्यय केला आहे.मात्र नुकत्याच घडलेल्या प्रकरणात संबंधीत भुखंड मालकाला दे माय धरणी ठाय करणारे सर्व संबधीत अधिकारी आणि कर्मचारी 3000 पैकी किमान 3 अतिक्रमणांचा विचार का करत नाहीत असा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.नगर पालिका व्यवसाययिक सुंकुलांच्या बाबत देखील यापूर्वी अधिकृत की अनाधिकृत असे वाद निर्माण झाले होते.शासकीय इमारतींनी यात्रा पटांगण अडवले आहे.याबाबत शासन यंत्रणा मुग गिळुन बसली आहे.विशेष म्हणजे व्यवसायिक संकुलाच्या माध्यमातून नगर पालिकेस ठोस उत्पन्न मिळते आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये सिंहस्थासाठी असलेल्या आरक्षणांना बगल देण्यासाठी प्रयत्न झाले.शासनाच्या निधीतून सिंहस्थ पार्कींगसाठी असलेल्या जागेवर बांधकाम झाले.स्वताच्या मालकीच्या जागेत अनाधिकृत म्हणजेच विनापरवानगी बांधकाम करणे,मंजुर असलेल्या मर्यादेपेक्षा जास्तीचे बांधकाम करणे,बहुमजली व्यवसायिक संकुलास पाकीद्दंग स्वच्छतागृह अशा सुविधा निर्माण न करणे,तळमजल्यावर पार्कींगच्या जागेत व्यवासायिक गाळे काढणे यासह एक ना अनेक प्रकारे नगर पालिका आणि टाऊन प्लॅनींग यांचे नियम धाब्यावर बसवण्याची जनु काही स्पर्धा सुरू झाली आहे.अर्थात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सतर्कतेने आरक्षीत भुंखडावरचे बांधकाम काढून घेण्याचा अथवा नियमानुकुल बदल करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



मालमत्ता धारकांनी बांधकाम करतांना नगर परिषद प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरातील अनाधिकृत आणि अतिक्रमीत बांधकामांची माहीती संकलीत करण्यात य्oात आहे.निदर्शनास आलेल्या अवैध बांधकामावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

संजय जाधव,मुख्याधिकारी,ञ्यंबक नगर परिषद

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago