डोके दुखत असल्यास 1 चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. अर्धशिशी मायग्रेन रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास अर्ध-शिशीचा त्रास नाहीसा होतो.
पूर्ण डोके दुखणे निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे 1-2 थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
सायनस सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
केसगळती
घाणीवरील खोबरेल तेल पाव लिटर, तुळशीची 2 पाने, जास्वंदाच्या झाडाची 2 पाने फुलाची नव्हे , 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण मेणबत्तीचे नव्हे 15 ते 20 ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर काळे होऊ देऊ नये ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा.स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
डोळ्यांसाठी
नागवेलीचे विड्याचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू / मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत. नाकातील हाड वाढल्यास 5 रिठे व 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप
पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते
सर्दीचा त्रास झाल्यास
दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये 2 मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
हे ही वाचा :