आकर्षक तोरणे, लायटिंगचा झगमगाट
नाशिक : गुणगुण यादव
गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस उरले असताना लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांकडून तयारीला वेग दिला जात आहे. बाप्पाच्या सजावटीला लागणारे विविध प्रकारचे मखर, लायटिंग, फुलांच्या माळांची खरेदी करण्यासाठी भक्तांची पावले दुकानांकडे वळत आहेत.

घरगुती तसेच सार्वजनिक गणपती मंडळांकडून सजावटीची तयारी सुरू झाली आहे. यंदा पारंपरिक सजावटीसोबत आकर्षक लायटिंग, प्लास्टिक फुलांच्या माळा, तोरणे आणि रंगीत कापडाचा वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कमी खर्चात सुंदर आणि आकर्षक देखावा तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याला मागणी आहे.
सजावटीच्या साहित्याचे दर
एलईडी सिरीज लायटिंग : 100 ते 500 रुपये.
प्लास्टिक फुलांच्या माळा : 50 ते 300
डेकोरेटिव्ह बल्ब : 30 ते 150
पडदा एलईडी लाइट : 300 ते 1,000
एलईडी माळ : 50 ते 200
एलईडी पट्टी : 50 ते 300 रुपये.
यासोबत फुलांची सजावट आणि आकर्षक एलईडी लायटिंगलाही मागणी वाढली आहे. (पीव्हीसी पाइप किंवा प्लास्टिक पाईप) या हलक्या टिकाऊ साहित्याला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. पीव्हीसी पाइपचा वापर मखर, कमान आणि मंडपाचा बेस तयार करण्यासाठी केला जातो. तो हलका असल्याने हाताळणे सोपे असून, त्यावर कापड, फुले आणि लायटिंग लावता येते. त्यामुळे घरगुती तसेच गणपती मंडळाच्या सजावटीमध्ये या साहित्याचा वापर वाढताना दिसत आहे.
थर्माकॉलवरील बंदीमुळे फोमचा पर्याय ग्राहकांनी निवडला असून, पारंपरिक देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती, फुलांच्या कमानी, रंगीत एलईडी लायटिंग व पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या थीम विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
Ready for Bappa’s decoration