राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर हालचालींना वेग

पवार-पटेल भेट, तटकरे म्हणाले, दादा असते तर आज दोन्ही एकत्र दिसले असते

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल मोठे भाष्य केले आहे. अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते, असे तटकरे म्हणाले. इतकेच नाही, तर अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा मागे पडली. मात्र, अजित पवार असते तर जी 12 फेब्रुवारी ही तारीख सांगितली जाते ती निश्चित झाली असती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या, असेही तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची नुकतीच रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर पटेल यांनी आम्ही राजकीयदृष्ट्या दुरावलो आहोत, पण मनाने नाही, असे वक्तव्य केले होते. आता यानंतर सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, तटकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरेचे चित्र वेगळे दिसले असते. दादांनाही तेच अपेक्षित होते. पक्ष मजबुतीने, ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायला हव्यात, हे शरद पवार आणि अजित पवारांना अपेक्षित होते. त्यादृष्टीनेच विलीनीकरणाची चर्चा झाली होती.

दोन्ही राष्ट्रवादींत नेमके काय घडतंय?
दि. 19 ऑक्टोबरला सर्वांत आधी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे गृहमंत्र्यांना भेटायला गेले. त्यावेळी पक्षातील इतर कोणतेही नेते त्यांच्या बरोबर नव्हते. पुन्हा एक दिवसाआड म्हणजे 21 तारखेला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांंची भेट घेतली. या भेटीनंतर 23 तारखेला पक्षातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांची सुनेत्रा पवार यांच्याबरोबर बैठक झाली. 25 तारखेला सकाळी कोअर कमिटीची बैठक होऊन त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरले.

 

Movements on NCP merger gain momentum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *