पटियाला :
पंजाबमधील पटियाला आणि राजपुरादरम्यान शुक्रवारी (दि.
6 नोव्हेंबर) मोठी रेल्वे दुर्घटना घडली. सराई बंजारा येथे कर्मभूमी एक्स्प्रेस रेल्वेच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. धावत्या रेल्वेला लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी आगीत अडकले होते. आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वेगाडी पंजाबहून बिहारकडे जात होती. त्यावेळी पटियाला येथे या रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली. धुराचे लोट वेगाने पसरले आणि प्रवासी घाबरून खाली उतरू लागले. आगीचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. दिवाळीसाठी रेल्वेगाड्या खचाखच भरलेल्या असतानाच हा अपघात घडला. कर्मभूमी एक्स्प्रेसला आग लागल्याने प्रवासी चिंतेत आहेत. मात्र, जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रायपुरा जंक्शनच्या आधी सराय बंजाराजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसला आग लागली. आग सर्वप्रथम पँट्री कारमध्ये लागल्याची माहिती समोर आली आहे.
Massive fire breaks out on Karmabhumi Express; passengers scramble in panic