नाशिक

प्रेमाचा रक्तरंजित थरारक शेवट

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून

सिडको : प्रतिनिधी
वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांजेगाव परिसरात मुकणे धरणाच्या बॅकवॉटरलगत असलेल्या हिरवी मिरची रिसॉर्ट येथे मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) दुपारी 34 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला लोखंडी गेट अंगावर पडून तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून, खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी महिलेचा प्रियकर दीपक शिवाजी सौंदाणे (वय 43, रा. नाशिक) याच्याविरुद्ध वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार रूपाली नीलेश पाटील (वय 34, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) या विवाहित महिला एका खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत होत्या. रूपाली पाटील आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीच्या पर्चेसिंग विभागात काम करणार्‍या दीपक सौंदाणे यांची सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात
रूपांतर झाले. रूपाली या नेहमीप्रमाणे सोनोग्राफी सेंटरमध्ये कामावर जात असल्याचे घरी सांगून दीपकला भेटण्यासाठी गेल्या होत्या. दीपक हा त्याच्या चारचाकी वाहनातून रूपालीला घेऊन सांजेगाव येथील हिरवी मिरची रिसॉर्टमध्ये घेऊन जात होता. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाहनातच वाद झाला.रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन आल्यानंतर रूपाली गाडीतून उतरून लोखंडी गेट उघडत असताना दीपकने रागाच्या भरात तिच्या अंगावर चारचाकी वाहन घातले. यात गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, पोलिसांना सुरुवातीपासूनच घटनेबाबत संशय होता. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण तसेच रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान संशयित दीपक सौंदाणे याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अपघाताच्या घटनेमागील खुनाचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवर्‍हे पोलिस करीत आहेत.

अपघाताचा बनाव; सीसीटीव्हीमुळे खुनाचा उलगडा

मयत रूपाली पाटील यांच्या अंगावर लोखंडी गेट पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे, फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि हिरवी मिरची रिसॉर्टबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून घटना अपघात नसून, खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयित प्रियकर दीपक सौंदाणे याला पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

16 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

16 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

16 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

16 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

16 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

17 hours ago